Black Candle म्हणजे काय ? आणि ती कधी वापरतात …

Black Candle म्हणजे काय ? आणि ती कधी वापरतात …

  • 08 February, 2026
  • Art Of Healing Admin

आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याचं ठोस कारण सापडत नाही. नकळत घरात अडचणी वाढतात. कोणीतरी आजारी पडतं, लहानसहान अपघात होतात, अचानक खर्च वाढतात, कामात अडथळे येतात. आपण म्हणतो, “आधी तर सगळं ठीक होतं, मग अचानक असं काय बदललं?”, पण उत्तर मिळत नाही. आपण शक्य ते सगळे उपाय करून पाहतो. उपाय, सल्ले, सकारात्मक विचार, धूप-दिवा. तरीही काहीतरी राहिल्या सारखं वाटत. जणू सगळं करूनही मूळ कारण हातात येत नाही.

अशा वेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपण बहुतेक वेळा फक्त दिसणाऱ्या गोष्टींवर उपाय करतो. पण आयुष्यातल्या अनेक अडचणी न दिसणाऱ्या स्तरावरून सुरू झालेल्या असतात. मनात साचलेला ताण, भीती, राग, जुने अनुभव, किंवा सतत नकारात्मक वातावरण हे सगळं हळूहळू Energy Level वर जमा होत जातं. जेव्हा ही Energy जास्त साचते, तेव्हा ती प्रत्यक्ष आयुष्यात अडचणींच्या रूपाने दिसायला लागते.
इथेच Black Candle चा विषय समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. 

कारण Black Candle बद्दल बहुतेक लोकांच्या मनात भीती असते. काळी मेणबत्ती म्हणजे काहीतरी वाईट, नकारात्मक किंवा धोकादायक. अशी समज अनेक वर्षांपासून पक्की झालेली आहे. पण खरं पाहिलं तर ही समज अपूर्ण आहे. Black Candle म्हणजे अंधार नाही, तर अडलेला अंधार साफ करण्याची Energy आहे.आपण रोज घर साफ करतो. धूळ साचली की झाडतो, पुसतो. कचरा जमा झाला की बाहेर टाकतो. पण Energy चं काय? घरात, मनात, शरीरात जी अदृश्य घाण साचते, ती आपण कशी साफ करतो?
इथेच Black Candle Energy Level वर Cleaning करण्याचं काम करते.

साध्या Candle आपण रोजच्या आयुष्यात जास्त करून Decoration आणि Celebration साठी वापरतो. Birthday असो, Christmas असो, Anniversary किंवा कुठलाही उत्सव Candle म्हणजे आनंद, प्रकाश आणि वातावरण सुंदर करण्याचं साधन. या Candle जागा सजवतात आणि सणाचा मूड तयार करतात. त्यामुळे आपल्या मनात Candle म्हणजे Celebration, आनंद याच्याशी जोडलेली भावना असते.
पण Black Candle यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका बजावते. ती सजावटीसाठी किंवा उत्सवासाठी नसते.

Black Candle तेव्हा वापरली जाते, जेव्हा आयुष्यात किंवा घरात काहीतरी बरोबर नाही असं आतून जाणवतं. सतत येणाऱ्या अडचणी, न कळत होणारा ताण, आजारपण, अपघात, किंवा घरात जाणवणारी Heaviness. अशा वेळी Black Candle वापरली जाते. ती आनंद वाढवण्यासाठी नाही, तर अडथळा ठरणारी, नकारात्मक किंवा अडकलेली Energy दूर करण्यासाठी असते.

Black Candle मध्ये काही Essential Oil असतात का?       
याचं उत्तर आहे, होय. चांगल्या दर्जाच्या Black Candle मध्ये काही खास Essential Oils वापरलेले असतात. हे Oils केवळ सुगंधासाठी नसतात, तर त्यांचा उपयोग Energy Cleansing, Protection आणि Grounding साठी केला जातो. उदाहरणार्थ, काही Oils मन शांत करायला मदत करतात, काही नकारात्मक ऊर्जा Release करण्याचं काम करतात, तर काही Oils Protective Shield तयार करण्यास उपयोगी ठरतात.

या Essential Oils मुळे Black Candle फक्त जळणारी Candle न राहता, Healing Tool बनते. Candle पेटवताना जेव्हा हे Oils हळूहळू गरम होतात, तेव्हा त्यांची Energy वातावरणात पसरते. त्यामुळे घरातील जडपणा कमी होतो, मनावरचा ताण हलका वाटायला लागतो आणि आसपासचं वातावरण अधिक Balanced होतं. म्हणूनच सगळ्या काळ्या Candle सारख्या नसतात. योग्य Essential Oils वापरलेल्या, Intention ने बनवलेल्या Black Candle चा परिणाम वेगळा आणि जास्त प्रभावी जाणवतो.

मग Black Candle वापरल्यावर नेमका फरक कसा पडतो? इथे लगेच चमत्कार होतो असं नाही. पण बदल जाणवायला लागतात. घरातलं वातावरण थोडं हलकं वाटतं. सतत होणाऱ्या छोट्या अडचणी कमी होतात. मन शांत होतं. झोप सुधारते. कारण मूळ Problem वर काम झालेलं असतं. जेव्हा Blocked Energy Free होते, तेव्हा परिस्थिती आपोआप बदलायला सुरुवात होते.

Black Candle कधी वापरायची हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा कारण नसताना गोष्टी बिघडतायत असं वाटतं, वारंवार आजारपण येतं, अपघात होतात, घरात तणाव वाढतो, किंवा “काहीतरी बरोबर नाही” अशी आतून जाणीव येते. तेव्हा Black Candle वापरली जाते. ही Candle कुणावरही वाईट परिणाम करण्यासाठी नसते. ती कोणावर Control ठेवण्यासाठी नाही. ती फक्त स्वतःचं आणि आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी असते.

तुम्ही इथं पर्यत वाचत आलेले आहेत अर्थात तुमचा Candle बद्दल चा Interest वाढला आहे, आणि आम्हला सांगायला आवडेल येत्या 15 फेब्रुवारीला Magic of Candle Rituals हा Webinar होत आहे. यात Candle Rituals चा वापर करून Career Growth पासून Marriage पर्यंतच्या इच्छा तुम्ही कश्या पूर्ण करून घेऊ शकता आणि कोणत्या Candle कशा प्रकारे वापरायच्या याची उत्तरे देणारा Life Changing Webinar होत आहे , खाली लिंक देत आहोत नक्की रजिस्टर करा.

Register for Magic of Candle Rituals Webinar
👉 https://imjo.in/tF7k3u

आज Black Candle बद्दल लोकांच Knowledge खूप मर्यादित आहे. आपल्याला Attraction बद्दल खूप सांगितलं जातं, पण Release बद्दल फारसं बोललं जात नाही. पण आयुष्यात Balance हवा असेल, तर दोन्ही गरजेचे आहेत.
Black Candle आपल्याला तेच शिकवते, आधी ओझं सोडायला शिका, मग पुढचा मार्ग आपोआप मोकळा होतो. Black Candle योग्य वेळी, योग्य हेतूने आणि योग्य समजुतीने वापरली, तर ती आयुष्यात Stability, Protection आणि Clarity आणायला मदत करते.

Share:
Older Post
Contact Image

Send Us a Message

You can reach us anytime via info@artofhealing.co.in