Your cart is empty now.
आपल्यापैकी कित्येकजण नेहमी Crystal वापरतात असतात. काम करताना किंवा Crystal जवळ असला की तो सतत मदत करतो, Protection किंवा Positivity वाढवत असतो, . त्यामुळे अनेक जण Crystal काढायचा याचाही विचार करत नाहीत. पण Crystal आणि आपली Energy यांचं नातं थोडं अधिक समजून घेणं गरजेचं आहे
Crystal हे दागिने नाहीत, किंवा फक्त शोभेच्या वस्तूही नाहीत. Crystal आपल्या Energy Field सोबत काम करतात. आपण ज्या अवस्थेत असतो, शरीर आणि मन ज्या पद्धतीने Respond करत असतात त्या सगळ्याशी Crystal Connect होत असतात. त्यामुळे Crystal चा परिणाम दिवसा आणि रात्री सारखाच राहीलच असं नाही.

दिवसा आपण Active Mode मध्ये असतो. काम सुरु असतात , अनेकांच्या बरोबर संवाद सुरु असतो , Back Of Mind अनेक विचार सुरु असतात. त्या वेळी काही Crystal आपल्याला Grounding देतात, Focus वाढवतात किंवा Confidence सपोर्ट करतात. पण रात्री झोपताना शरीर आणि मन पूर्णपणे वेगळ्या अवस्थेत जातं. शरीराला विश्रांती पाहिजे असते,
याच टप्प्यावर Crystal ची भूमिका बदलते. काही Crystal ची Energy खूप Strong, जागरूक ठेवणारी असते. ही Energy दिवसा उपयुक्त ठरते, पण रात्री ती मनाला पूर्ण विश्रांती घेऊ देत नाही. त्यामुळे काही लोकांना झोप लागत नाही, झोप उडते, जास्त स्वप्न पडतात किंवा सकाळी उठल्यावर शरीर जड आणि थकलेलं वाटतं.
अनेकदा लोकांना असं वाटतं की झोप नीट न लागणं म्हणजे Stress, मोबाइलचा वापर किंवा दिनक्रमाची चूक. हे कारणं असू शकतातच, पण कधी कधी Crystal ची Energy सुद्धा त्यात भूमिका बजावत असते. विशेषतः जे लोक Energy ला जास्त Sensitive असतात, त्यांना हा परिणाम लवकर जाणवतो.
म्हणून सगळे Crystal झोपताना योग्य असतात असं नाही. प्रत्येक Crystal ची Vibration वेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीची Energy Capacity, Sensitivity आणि Mental Condition वेगळी असते. एकाच Crystal चा अनुभव दोन लोकांसाठी पूर्णपणे वेगळा असू शकतो.

Crystal वापरणं म्हणजे फक्त “घातलं की झालं” एवढंच नाही. Crystal कधी वापरायचा, किती वेळ वापरायचा, आणि कधी बाजूला ठेवायचा हे सगळं Crystal Knowledge भाग आहे. जसं शरीराला कामानंतर विश्रांती लागते, तसंच Energy System ला देखील Balance लागतो.
झोप ही आपल्या Energy System साठी अत्यंत Delicate अवस्था असते. अशा वेळी अतिशय Strong Energy आसपास असेल, तर Relaxation मध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणूनच काही वेळा Crystal झोपताना बाजूला ठेवणं, किंवा फक्त काही Specific Soothing Crystal जवळ ठेवणं अधिक योग्य ठरतं.
Crystal झोपताना घालायचा की नाही, याचं उत्तर एका नियमात बसत नाही. ते Crystal च्या प्रकारावर, तुमच्या सध्याच्या Energy State वर, दिवसभर तुमच्यावर आलेल्या मानसिक-भावनिक ताणावर आणि तुमचं शरीर त्याला कसा प्रतिसाद देतं यावर अवलंबून असतं.
लक्षात घ्या ! ठरविक Crystal योग्य वेळेला काढणं म्हणजे Crystal ला नाकारणं नाही, तर Energy सोबत जाणीवपूर्वक काम करणं आहे Crystal म्हणजे वस्तू नाही, तर योग्य वेळी, योग्य समजुतीने वापरण्याचं Energy Tool आहे. आणि आपल्या शरीर-मनाच्या गरजा समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं.
कदाचित हा Blog वाचून लगेच काही बदल होणार नाही. पण पुढच्या वेळी झोपताना Crystal काढायचा की नाही, हा विचार तुमच्या मनात नक्की येईल. आणि तोच विचार Crystal Energy च्या जागृकते बद्दलची पहिली पायरी ठरू शकते .
You can reach us anytime via info@artofhealing.co.in