Negative Vibration  घरात का वाढतात?

Negative Vibration घरात का वाढतात?

  • 24 April, 2026
  • Art Of Healing Admin

अनेकांना असं जाणवतं घरात सगळं ठीक चाललेलं आहे, काही विशेष घडलेलं नाही. तरीही विनाकारण भीती वाटते. मन स्थिर राहत नाही. घरात प्रसन्न वातावरण असायला हवं पण उलटच जाणवत.सुरुवातीला आपण हे Ignore करतो पण जेव्हा हे वारंवार घडायला लागतं, तेव्हा प्रश्न पडतो नेमकं चुकतंय कुठे?

 

आपण बहुतेक वेळा कारण बाहेर शोधतो कामाचा ताण, नाती, परिस्थिती. पण एक गोष्ट आपण दुर्लक्ष करतो. ती म्हणजे आपल्या घरातली Energy. Negative Vibes किंवा Negative Energy अचानक निर्माण होत नाही.ती हळूहळू तयार होते आणि तशीच साठत जाते.

ज्या जागेत सतत ताण, राग, भीती, काळजी किंवा न व्यक्त न केलेल्या गोष्टी असतात. त्या जागेत त्या भावनांचा ठसा पडतो. वाद, Negative Thought, प्रत्येक दडपलेली भावना त्या जागेत जमा होत जाते.सुरुवातीला काही जाणवत नाही. पण हळूहळू त्या जागेचं वातावरण बदलायला लागतं. घरात शांतता असली तरी मन शांत राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते. कधी संवाद टाळावा असं वाटतं. कधी घरात राहूनही एकट रहावं वाटतं.

आणखी एक गोष्ट आपल्या घरात फक्त आपलीच Energy नसते. घरात येणारे लोक, त्यांचे विचार, याचाही परिणाम त्या जागेवर होतो. घर व्यवस्थित असतं, पण तरीही कधी वातावरण बदललेलं वाटतं यामागे ही कारणं असू शकतात.याचा अर्थ असा नाही की काहीतरी चुकीचं किंवा भीतीदायक घडतंय.पण एक गोष्ट नक्की Energy स्थिर राहत नाही, ती साठते आणि बदलते.

म्हणूनच घराकडे फक्त Space म्हणून न पाहता, Vastu Science च्या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचं आहे. जिथे आपण काय बोलतो, काय विचार करतो, आणि कसं जगतो याचा त्या जागेवर परिणाम होत असतो.

हा Blog जाणीव करून देतो. घरात जे जाणवतंय, ते फक्त परिस्थिती नाही. कदाचित ती त्या जागेत साठलेली Energy असू शकते.आणि कदाचित हे समजून घेतल्यावरच घरात  पुन्हा प्रसन्न वाटायला सुरुवात होईल.

Share:
Older Post Newer Post
Contact Image

Send Us a Message

You can reach us anytime via info@artofhealing.co.in